
आमीरखानचा मुलगा जुनेद हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आमीरची पहिली पत्नी रीना दत्त हिच्यापासून झालेला जुनेद आत्ता फक्त सतरा वर्षांचा आहे. मात्र तो अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये येत नसून आत्ता तो राजकुमार हिरानीचा सहाय्यक म्हणूनच काम करणार आहे असे समजते. जुनेदला पहिल्यापासूनच चित्रपट दिग्दर्शनात रूची आहे. मात्र हे काम मिळविण्यासाठीही त्याला आमीरला पटवावे लागले आहे तसेच अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार नाही असेही वचन द्यावे लागले आहे.
