रिलेशनशिपमध्ये असताना तुम्हाला दोघामधील नाते संबध अधिक दृढ करण्यासाठी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे असा प्रश्न भेडसावत असेल. तर अशावेळी अभिनेत्री विद्या बालनकडून काही गोष्टी शिकायला हरकत नाही. सध्या विद्या ज्या पद्धतीने तिच्या मित्रासोबत रिलेशन ठेऊन आहे. त्या पद्धतीचा जर सर्वानीच अवलंब केला तर नाते संबध कायम टिकवण्यासाठी मदत होईल असे वाटते.
नातेबंध दृढ होण्यासाठी विद्याच्या खास टिप्स
काही दिवसापूर्वी विद्याचा मित्र सिद्धार्थ कपूरने तिला १४ कोटीचा बंगला भेट दिला आहे. सध्या विद्या या बंगल्याच्या सजावटीच्या कामात व्यस्त आहे व त्यासाठी डेकोररची मदत घेत आहे. हा बंगला तयार होण्यास अजून सहा महिन्याचा अवधी आहे. विद्या मात्र दररोज येऊन कामाची पाहणी करून जाते. ही पाहणी करण्यसाठी विद्या एकटीच येते. या ठीकाणी काम चालू झाल्यापासून तिचा मित्र सिद्धार्थ कपूर मात्र आतापर्यंत एकदाच येऊन गेला आहे. त्यामुळे दोस्ताला जर खूष ठेवायचे असेल तर ही होममेकरची कल्पना तुम्हाला कशी वाटली. ही कल्पना जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्राला खूष ठेवण्यासाठी या टिप्सचा अवलंब करायला काही हरकत नाही.