पित्त वारंवार खवळतंय ? हे करून पहा

पित्त किवा अॅसिडीटी ही आजकाल अगदी लहानमुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही होताना दिसते. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ, मसालायुक्त पदार्थांचे, तळकट पदार्थांचे सेवन करण्याकडे वाढलेली प्रवृत्ती, झोपेच्या बदललेल्या वेळा यामुळे पित्ताचे विकारही वाढले आहेत. पित्तावर आजकाल बाजारात अनेक अँडासिड गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. मात्र वारंवार या गोळ्या घेणे एकंदर प्रकृतीच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे पित्त होत असेल तर घरच्याघरीच कांही रोजच्या वापरातले पदार्थ वापरूनही त्यावर नियंत्रण मिळविता येते.

acidity

आजकाल पित्ताचा त्रासही बर्‍याचजणांना सतावत असतो. त्यासाठी अनेक प्रकारच्या अँटासिड गोळया बाजारात आहेत. पण घरगुती उपचारात १/४ चमचा ज्येष्ठमध पावडर दूध अथवा पाण्यातून दिवसातून दोन वेळा तीन दिवस घेण्याने पित्ताचा त्रास कमी होतो. अमसूल सरबत प्यायल्याने ही पित्त कमी होते.

acidity1

गार वारे लागल्यामूळे अंगावर येणार्‍या पित्ताला शैतपित्त म्हणतात.या पित्तावर खायचा सोडा कोरडाच अंगाला लावून अर्ध्या तासाने आंघोळ करावी म्हणजे हा त्रास कमी होतो. पित्त कमी करण्यासाठी गार केलेले दूध भरपूर साखर घालून थोडे थोडे वारंवार प्यायल्यास पित्तामुळे पोटात अथवा छातीत होणारी जळजळ कमी होते. दूध गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले तरी चालते.

acidity2

बाजारात सूतशेखर मात्रा मिळते.पित्तावर ही मात्रा उगाळून दुधातून घेतल्यासही आराम मिळतो. पित्तामुळे होणार्‍या उलट्या थांबविण्यासाठी दूध आणि घरातील फ्रिजमध्ये तयार केलेला चांगल्या पाण्याचा बर्फ एकत्र करून प्यायल्यास उलट्या कमी होतात. काही वेळा अति पिकलेली फळे, खराब झालेले अन्न व अन पदार्थात काही मिसळले गेल्याने अन्न विषबाधा होते.यात उलटया, जुलाब ही प्रमुख लक्षणे आढळतात.याची तीव्रता कमी असेल तर रुग्णाला लिंबू सरबत थोडेथोडे पण सतत पाजत राहिल्याने उतार पडतो. मात्र तीव्रता खूप असेल तर वेळेवर रुग्णालयात हलविणे श्रेयस्कर असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment