
सोशल नेटवकिंर्ग साइट् फेसबुकवर कसिनो सारखे खेळ आल्यानंतर तज्ज्ञांनी इशारा दिला की, अशी साइट्स तरूणांना जुगाराची सवय लावत आहे. सवय व लतचे अध्ययन करणार्या ब्रिटेनच्या तज्ज्ञाने म्हटले की, याप्रकारचा खेळ किशोर व तरूणांना हा विचार करण्यासाठी प्रेरित करीत आहे की, जुगार एक नुकसानरहित आनंद आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार याप्रकारच्या खेळात मुले आभासी नाण्याचा उपयोग करतात. अशा खेळात संगणक किंवा मोबाइल फोनद्वारे खजिना खगाळणे किंवा आपली भांडवल वाढवणे एक रोमांच निर्माण करते.