`नशीब नवाचे’ मध्ये दोन मैत्रिणींची धम्माल

आपले नशीबाचे तारे चमकवण्यासाठी या सेलिब्रेटी वीक मध्ये नामांकित कलाकारांची धम्माल मस्ती पाहायला मिळणार आहे. ‘नशीब नवाचे’ या लोकप्रिय शोची संकल्पना डॉ. बालाजी तांबे यांची आहे. या शोमध्ये सामान्यज्ञानाबरोबरच बंपर बक्षीस जिंकण्याची संधी मिळाल्याने सहभागी झालेल्या या दोन्ही स्पर्धक सेलिब्रेटी परिवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

‘नशीब नवाचे’ या कौटुंबिक गेम शोमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सेलिब्रेटी एपिसोडमध्ये स्नेहा वाघ व कुटुंबीय आणि सोनाली खरे व कुटुंबीय या दोन अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळाली. स्नेहा वाघ व कुटुंबीय आणि सोनाली खरे व कुटुंबीय या दोघांमध्ये चुरशीची लढत रंगली असून, या गेम शोमध्ये गुरूवारी झालेल्या भागात स्नेहा वाघ व कुटुंबीय विजयी झाले. या भागात अनेक टास्कही या दोघीजणींनी केले, धमाल मस्तीही केली आणि आपापले अनुभवही शेअर केले.

याच सप्ताहातल्या शुक्रवारच्या खेळासाठी सेलिब्रेटी एपिसोडमध्ये पूजा सावंत आणि पूर्वा पवार अशा दोन अभिनेत्री आपापल्या कुटुंबियांच्या मदतीने नशीब नवाचे आजमावून पाहणार आहेत. पूजा सावंत आणि पूर्वा पवार या दोघी खास मैत्रिणी आहेत. पुजा सावंत सोबत वडील विलास सावंत, आई अमृता सावंत आणि बहिण रूचिरा सावंत असे तिघेजण साथ देणार आहे. पुजा सावंतचे वडील हे नाटकांमध्ये काम करतात.  

आता या दोन मैत्रिणीमधली चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या एपिसोडमध्ये विजयी झालेले दोन कलाकार त्यांच्या फॅमिलीसोबत शनिवारच्या भागात एकमेकांसमोर उभ्या राहतील आणि त्यांच्यातल्याच विजयी झालेल्या एकाला फॅमिली कार मिळणार आहे. डॉ. बालाजी तांबे यांची संकल्पना असलेल्या ‘‘नशीब नवाचे’’ हा नवा रिऍलिटी गेम शो गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असा याही आठवड्यातले तीन दिवस, रात्री ९:००वाजता साम टीव्हीवर रंगणार आहे.

Leave a Comment