प्रत्येकाला माझ्या लग्नाची चिन्ता -सलमान

बॉलीवुड जगतातच नाही तर देशभरातील चाहते, प्रसिद्ध अभिनेता `सलमान खान लग्न कधी करणार’, याबाबत उत्सुक आहेत. मात्र `दबंग’ खानला आपल्या लग्नाबाबत अजिबात घाई दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या लग्नाबाबतच का बोलतो, या प्रश्‍नाने तो हैराण झाला आहे.

अभिनेता आमिर खानने अशी टिप्पणी केली होती की, सलमानसाठी वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याची ही चांगली वेळ आहे. मात्र, ४६ वर्षीय `दबंग’ सलमानने प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमिर याबाबत काही दिवसांपासूनच माझ्या मागे लागला आहे. मात्र मला हे कळत नाही की, प्रत्येक जण माझ्या लग्नाच्या मागे लागला आहे? सलमान आपल्या आगामी ऍक्शन थ्रिलर `एक था टाइगर’च्या एका प्रोमोशनल कार्यक्रमात बोलत होता.

कबीर खान दिग्दर्शित यशराज फिल्मसच्या प्रोजेक्टमध्ये सलमान आपली माजी गर्लफ्रेंड कैटरीना कैफबरोबर या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कैटरीना एके ठिकाणी बोलताना म्हणते की, आता त्याचे (सलमान) वय झाले असून त्याने लग्न केले पाहिजे.

सलमानच्या लग्नाबाबत विचारले असता कैटरीना म्हणाली, माझ्या मते संबंधीत अभिनेत्याशिवाय इतर कोणीही निर्णय घेऊ नये की कोणत्या वयात त्याने लग्न करावे.

कबीरने तर स्पष्ट सांगितले की, तो संवाद मी जाणीवपूर्वक या चित्रपटात टाकला नाही. मात्र तो टाकण्यापासून मी स्वतःला आवरू शकलोदेखील नाही.

Leave a Comment