किंगफिशरचे वैमानिक पुन्हा संपावर; २८ उड्डाणे रद्द

मुंबई दि.१४ – मुंबईतील किंगफिशर एअरलाईन्सचे वैमानिक शनिवारी सकाळी अचानक संपावर गेल्याने २८ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, शनिवारी सकाळी किंगफिशरचे वैमानिक कामावर न आल्याने मुंबईतील आयटी ४१४१ हे कांडलाकडे, आयटी १८१ हे चेन्नई आणि आयटी१०१ हे बंगळूरूकडे जाणारी विमाने रद्द करण्यात आली. तर दिल्लीतील २५ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून किंगफिशर प्रशासन आणि वैमानिकांमध्ये वेतनाच्या मुद्द्यावरून वाद सुरु आहेत. शुक्रवारी वेतन जमा होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ते जमा न झाल्याने वैमानिक आणि कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या बारा महिन्यांत तिसर्‍यांदा वैमानिक संपावर गेले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment