ऑलिंपिकच्या सुवर्ण पदकात ९२ टक्के चांदी!

नवी दिल्ली, १४ जुलै-लंडन ऑलिंपिकमध्ये विविध स्पर्धात पहिले स्थान मिळविणार्‍या खेळाडूंना दिले जाणारे जे विशिष्ट सुवर्ण पदक तयार करण्यात आले आहे त्यात चांदीचे प्रमाण भरपूर आहे. सोने नावालाच आहे. ऑलिंपिकसाठी मंच सजला आहे आणि पहिल्या तीन स्थानी राहणार्‍या खेळाडूंसाठी पदकदेखील तयार करण्यात आले आहेत.

मात्र नेहमीप्रमाणे सोन्याच्या पदकात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमानुसार जेवढे सोने असणे अनिवार्य आहे, तेवढेच ठेवण्यात आले आहे. या क्रीडा महाकुंभासाठी तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पदकात सोने केवळ १.३४ टक्के आहे. सुवर्ण पदकात ९२.५ टक्के चांदी आणि ६.१६ टक्के तांबे आहे.

रौप्य पदकात ९२.५ टक्के चांदी आणि ७.५ टक्के तांबे तर कास्य पदकात ९७ टक्के तांबे, २.५ टक्के झिंक आणि ०.५ टक्के टिन आहे. ऑलिंपिकदरम्यान ३० पेक्षा जास्त ठिकाणी ३०० पेक्षा जास्त पदक वितरण समारंभ होणार आहे. यादरम्यान सुमारे २१०० पदके वाटली जातील. मात्र आयोजकांनी ऑलिंपिक आणि याचदरम्यान होणार्‍या पॅरालम्पिकसाठी सुमारे ४७०० पदक तयार केली आहेत. ब्रिटिश कलाकार डेविड वाटकिन्स यांनी मुख्य ऑलिंपिक तर, लिन चीयुंग यांनी पॅरालम्पिकच्या पदकांचे डिजाइन तयार केले आहे. वेल्सच्या पोंटिक्लन येथील रायल मिंटमध्ये याची निर्मिती केली आहे.

प्रत्येक पदक बनविण्यासाठी दहा तासांचा वेळ लागला. पदकांच्या निर्मितीसाठी एक मोठी आणि खास मशीन कोलोसस तयार करण्यात आली होती. जगात अशाप्रकारच्या फत्त* दोनच मशीन आहेत. या पदकांच्या पुढील भागात ग्रीसची देवी नाइकीचे चित्र आहेत. तीला विजयाची देवी मानले जाते. मागील भागावर खेळाचा लोगो, टेम्स नदी आणि अनेक रेषा आहेत. या रेषा खेळाडूंची ऊर्जा तसेच खेळ भावनेचे दर्शन घडवितात.

Leave a Comment