करिना कपूर होणार महिला पंतप्रधान

प्रकाश झा यांच्या पोलिटिकल सिक्वेलमध्ये करिना कपूर भारतीय महिला पंतप्रधानांची भूमिका साकारणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या वर्षअखेर हा चित्रपट सेटवर जात असून अजय देवगण त्यात प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी करिनाचे नांव अजय यानेच प्रकाश झा यांना सुचविले असल्याचे व झा यांनी ते त्वरीत मान्य केल्याचेही सांगण्यात येत आहे.

ओंकारानंतर करिना प्रथमच इतकी मोठी भूमिका साकारणार असून यात ग्लॅमरला अजिबात संधी नाही. उलट परफॉर्मन्स ओरियंटेड असलेल्या या भूमिकेबाबत करिनाही उत्सुक आहे. आपली ग्लॅमरस इमेज मोडण्याची ही मोठी संधी असल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र या भूमिकेसाठी तिला बराच अभ्यास करावा लागणार असल्याने तिने आत्ताच आपल्या टीमला जगभरातील सर्व महिला पंतप्रधानांविषयीची माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पंतप्रधान महिला बोलतात कशा, चालतात कशा ,वागतात कशा याची सर्व माहिती गोळा करून करिना त्यावर विचार करणार आहे असेही समजते.

संजय लिला भन्साळीच्या रामलिला या बिगबजेट चित्रपटातून करिनाला बाहेर काढल्याची बातमी अजून ताजी असतानाच ही नवी मोठी बातमी समजल्याने करिनाचे फॅन खूष आहेत.

Leave a Comment