
मैसुर, दि. १५ – भारत आपल्या महत्वकांक्षी मंगल मिशनवर प्रगती करत आहे. अपेक्षा आहे की, याची आगामी वर्षी नोव्हेंबरमध्ये अंमलबजावणी केली जाऊ शकते. अंतराळ विभागातील एक मुख्य अधिकार्याने ही माहिती दिली.
मैसुर, दि. १५ – भारत आपल्या महत्वकांक्षी मंगल मिशनवर प्रगती करत आहे. अपेक्षा आहे की, याची आगामी वर्षी नोव्हेंबरमध्ये अंमलबजावणी केली जाऊ शकते. अंतराळ विभागातील एक मुख्य अधिकार्याने ही माहिती दिली.
अंतराळ विभागाचे सचिव व भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्त्रोचे) अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी येथे पत्रकारांना सांगितले, या संभावित मिशनच्या संदर्भात अनेक अध्ययन करण्यात आले.
त्यांनी पुढे सांगितले, आम्ही आता याला मंजूर करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहचलो आहोत. मला विश्वास आहे की, लवकरच मंगल मिशनविषयी घोषणा केली जाईल. इस्त्रोच्या अधिकार्यांनुसार प्रस्तावित मंगल मिशनविषयी अनेक महत्त्वपूर्ण कामाची अंमलबजावणी केली जाईल आणि वैज्ञानिक पेलोडों (अंतराळ उपकरणाची) यादी तयार करण्यात आली आहे.
भारतीय मंगलची कक्षापर्यंत मिशनसाठी प्रकल्प अहवाल सरकारी मंजूरीसाठी सोपवण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलवी) द्वारे एक परिक्रमा करणारे उपकरणाला (आर्बिटर) प्रक्षेपित करण्याची योजना आहे.
वैज्ञानिक उपकरण मंगल गृहाच्या चोहीकडे ५०० पट ८०,००० किलोमीटरच्या कक्षेत परिक्रमा करेल. यात सुमारे २५ किलोग्रामचे एक वैज्ञानिक पेलोडने सज्ज असण्याची तरतुद राहील.
इस्त्रोनुसार मंगल मिशनचे ध्येय त्या गृहावर जीवनाची शक्यता, जलवायु, भूतत्व व या गृहावर जीवनाच्या निरंतरता असण्याबाबत शोध लावण्याचा आहे.