
अभिनेता आमिर खानने आपल्या `सत्यमेव जयते’ या शोची दुसर्या आवृत्ती पुढील वर्षी प्रसारित करण्याची योजना आखली आहे. मात्र, शोची रिसर्च टीम आणि प्रोडक्शन हाऊस यांच्यातील मतभेदामुळे ही योजना साकार होण्यात अडसर दिसत आहे.

अभिनेता आमिर खानने आपल्या `सत्यमेव जयते’ या शोची दुसर्या आवृत्ती पुढील वर्षी प्रसारित करण्याची योजना आखली आहे. मात्र, शोची रिसर्च टीम आणि प्रोडक्शन हाऊस यांच्यातील मतभेदामुळे ही योजना साकार होण्यात अडसर दिसत आहे.
सूत्रानुसार सुरूवातीला शोच्या निर्मितीची धुरा बिग सिनर्जीचे सिद्धार्थ बसु यांच्याकडे होती आणि आमिरला फक्त शोचे संचालन करायचे होते. विशेष म्हणजे शोची रूपरेखा बिग सिनर्जीनेच तयार केली होती. मात्र, नंतर आमिरच्या प्रोडक्शन हाऊसने त्यावर आपला कब्जा केला. बसु ऑक्टोबर, २०११ मध्ये शो विषयीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. मात्र नंतर ते कुठेच दिसले नाही. एवढेच नाही, तर शोच्या निर्मितीदरम्यान रिसर्च टीमच्या काही खास मुद्द्यांना महत्त्व देण्यात आले नाही. या कारणामुळे शोच्या दुसर्या आवृत्तीबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे.
सूत्रांनुसार आमिर छोट्या पडद्यावर आपल्या पहिल्या शोचा निर्माता स्वतः बनू इच्छित होता. चॅनलनेही आमिरची मुख्य निर्माताबरोबर सह-निर्माता बनविण्याची मागणी मान्य केली. यामुळे रिसर्च टीमचे काही सदस्य आमिरच्या प्रोडक्शन हाऊसशी जोडले गेले. शोची पहिली आवृत्ती सर्वांपुढे आली आहे. पुढील आवृत्तीत शोचे धोरण काय असेल, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आमिर ज्या कंपन्यांचा ब्रँड अँबेसडर आहे, त्यांना शोचे प्रायोजकत्व न स्वीकारण्यास सांगितले होते. अन्यथा जाहिरातीतही त्याचाच पगडा राहिला असता. चॅनलचे हेच धोरण राहिले तर त्याला वित्तीय संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण शोची टीआरपी चांगली नाही. शिवाय वर्षाअखेरी रिसर्च टीम गेम शो `कौन बनेगा करोत्रडपती’च्या नवीन आवृत्तीच्या तयारीत व्यस्त असेल.
आमिर `धूम-३’ चे चित्रिकरण आणि `तलाश’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असेल. अशात दुसरी आवृत्ती अडचणीत येऊ शकते.