राष्ट्रपती निवडणुकीनंतर डिझेल भडकणार?

नवी दिल्ली, दि. १२ – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर म्हणजे १९ जुलै नंतर डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील एका वरीष्ठ अधिकार्‍याने गुरुवारी दिली. मात्र ही वाढ किती रुपयांची असेल याबाबत नेमकी माहिती आता देता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे महागाईत होरपळत असलेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिझेलच्या किमतीमध्ये २५ जून २०११ पासून वाढ झालेली नाही. त्यामुळे सरकारला दर लिटरमागे १० रुपये ३३ पैशांचे नुकसान सोसावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. डीझेलचे दर कमी राखण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणार्‍या अनुदानात कपात होण्याची शक्यता असल्याने डिझेलच्या दरात वाढ होणार आहे.

Leave a Comment