जगातील सर्वात महागडी फरारी अपघातग्रस्त

लंडन, दि. ११ – जगातील सर्वात महागडी फरारी फ्रान्समध्ये अपघातग्रस्त झाली. काही महिन्यापूर्वीच एका अब्जाधिशाने ही सर्वात महागडी फरारी खरेदी करून प्रसिद्धी मिळविली होती.

अब्जाधिश क्रिस्टोफर काक्स फरारी २५० जीटीओमध्ये आपली पत्नी एनबरोबर काक्स फरारी २५० जीटीओच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त जात होते. मध्य फ्रान्समध्ये झालेल्या या अपघातात एन यांचा पाय मोडला आहे. या इटालियन स्पोर्ट्स कारला मोटरिंग जगतात पिकासो असे संबोधले जाते.

क्रिस्टोफर यांनी अमेरिकेत २ कोटी पौंड अर्थात सुमारे १७० कोटी रुपयांत ही क्लासिक फरारी खरेदी केली होती. त्यामुळे हा अपघात जगातील सर्वात महागडा कार अपघात मानला जात आहे.