सिंगापूर, दि. १३ – `याहू’ या सर्च इंजिन तथा संकेतस्थळावरील ई-मेल खाते वापरणार्या साडेचार लाख युजर्सचे तपशील व पासवर्ड चोरल्याचा म्हणजेच हॅक केल्याचा दावा एका पूर्वपरिचित ऑनलाइन गटाने केला आहे.
`याहू’ची साडेचार लाख खाती हॅक
`द आर्स टेक्निका’ या तंत्रज्ञान-वृत्त विषयक संकेतस्थळाने ही बातमी दिली आहे. ’डी३३डीएस कंपनी’ असे म्हणवणार्या गटाला याहू संकेतस्थळाच्या एका भागातील असांकेतिक माहिती मिळाली आहे, असे या बातमीत म्हटले आहे. याहूच्या सिंगापूर येथील प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
हॅक केलेली खाती याहूच्या `व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’मधील (व्हीओआयपी) आहेत. `व्हॉइस’द्वारे याहूची जलद संदेशसेवा (मेसेंजर) चालविली जाते. `जजाह’ या व्हीओइपी प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉइस सेवा चालविली जाते. टेलिफोनिका युरोप बीव्ही या कंपनीने २०१० मध्ये `जजाह’ खेरदी केले होते.
हॅकिंगचा दावा करणार्या गटाचे संकेतस्थळ नंतर मात्र उपलब्ध होत नव्हते. दरम्यान, हा जागरुकतेचा प्रयत्न असून, याहूला याद्वारे कोणताही इशारा आम्ही देऊ इच्छित नाही, असे या हॅकर्सने म्हटले आहे.