
नवी दिल्ली, दि. १२ – सोशल मीडियाची ताकद सर्वांनाच चक्रावून टाकणारी ठरतेय. अनेकांशी एकाच वेळी संवाद साधण्यासाठी, आपले म्हणणे मांडण्यासाठी फेसबूक, टिवटरसारख्या सोशल साईटसचा वापर आता अनेकांना गरजेचा वाटू लागला आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही याच मार्गाचा वापर केला आहे. त्यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी चक्क ’फेसबूक’ची निवड केली आहे.