पीटरसन करणार वनडे मध्ये पुनरागमन

 काही दिवसापूर्वीच इंग्लंड संघाचा माजी कर्णधार व धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनने वनडे व ट्वेंटी२० संघातून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आता त्याने पुन्हा वनडे मध्ये पुनरागमन करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

केविन पीटरसनने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डावर अनेक आरोप झाले. हे आरोप होत असतनाच पीटरसनने वनडे क्रिकेट मधून घेतलेल्या निवृत्तीविषयी पुनर्विचार करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्याची पत्नी, आई, भाऊ व घनिष्ट मित्रांनी हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात त्याला विनवणी केली असल्याचे समजते. त्यामुळे तो हा निर्णय मागे घेण्याच्या विचारात आहे. केविन पीटरसन नसल्याने इंग्लंडचा संघ खूपच कमजोर झाला आहे. जरी त्याने पुनर्विचार करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात तो मैदानावर केंव्हा उतरणार याबाबत साशंकता आहे.

भारतातील आयपीएलमध्ये खेळल्यामुळे त्याला वनडे व ट्वेंटी२० संघातून निवृत्ती जाहीर करावी लागली असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. याबाबत पीटरसनला विचारले असता तो म्हणाला की, मी यापुढे ही आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. प्रत्येकाचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न असते. या स्पर्धेत खेळून प्रत्येकालाच पैसा कमवायचा असतो. मोठे खेळाडू हे जास्त प्रेक्षकासमोर खेळत असतात. जास्त प्रेक्षकांसमोर खेळण्याचा आनंद वेगळा असतो त्यामुळे मला काही यामध्ये गैर वाटत नाही.

Leave a Comment