प्रियंका चोप्रा गाणार गाणे

अभिनेत्री  प्रियंका चोप्रा हिने एक अल्बम तयार केला असल्याची  चर्चा काही दिवसापासून होत असतानाच जुन्या काळातील जंजीर या चित्रपटाचा रिमेक असलेल्या चित्रपटासाठी प्रियंका गाणे गाणार असल्याचे समजते.

दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्या चित्रपटात प्रियंका पहिल्यांदा गाणे गाणार आहे. प्रियंका चोप्रा हिच्या पूर्वीही काही अभिनेत्रीनी गाणे गायले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा पासून ते करीना कपूरपर्यंत अनेकाचा समावेश आहे. रेखाने खुबसुरत चित्रपटासाठी सारे नियम तोड दू हे गाणे गायले होते. तर श्रीदेवीने चांदणी चित्रपटसाठी रंग भरे बादल से, माधुरी दिक्षितेने देवदाससाठी छेडे मोहे, जुही चावलाने भूतनाथ चित्रपटासाठी चलो जाने दो तर करीनाने कुर्बान चित्रपटासाठी रसिया.. हे गाणे गायले होते. 

दिग्दर्शक अपूर्व लाखिया गेल्या काही दिवसापासून प्रियंकाकडून तयारी करून घेत आहेत.  या चित्रपटाचे शुटींग ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर हे गाणे रेकॉर्ड केले जाणार आहे. प्रियंकाच्या दृष्टीने तिचे हे चित्रपटतील पहिलेच गाणे आहे. त्यामुळे हे पहिले गाणे चांगले व्हावे यासठी ती प्रयत्नशील आहे. तोपर्यंत तिच्या पाहिल्या आंतरराष्ट्रीय अल्बमचे काम पूर्ण होणार आहे.

Leave a Comment