फोटो चे भाषांतर करू शकणारे अॅप बाजारात

अँड्रोइड व आयफोन वर स्पॅनिश, इटालियन वा फ्रेंच भाषेचे कॅमेर्‍याच्या सहाय्याने क्षणात इंग्लिश भाषेत भाषांतर करू शकणारे नवे “वर्ड लेन्स” अॅप बाजारात आले आहे. वर्ड लेन्सचा वापर  फोनमधील कॅमेरा टेक्स ओळखण्यासाठी यात वापरला जातो. लेन्समधून दिसणारे शब्द या अॅपच्या सहाय्याने इंग्रजीत भाषांतरीत केले जातात. अॅपच्या सहाय्याने टेक्स्ट ओळखून तो शब्द किवा फ्रेज काय आहे त्याचे अॅटोमॅटिक ट्रान्सलेटर सॉफ्टवेअरच्या मदतीने नवीन भाषेत भाषांतर केले जाते. मग हे भाषांतर मूळ जागेवर पेस्ट केले जाते असे समजते.

या अॅपचा प्रमोशनल व्हिडीओ इंटरनेटवर एकदमच हिट झाला असून त्वरीत भाषांतर करू शकणार्‍या या अॅपबद्दल तरूणांत खूप कुतुहल निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. आयफोन वर स्पॅनिशचे इंग्लिश भाषेत भाषांतर करण्याची सुविधा सुमारे १८ महिन्यांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र आता अँड्रोइड व आयफोन अशा दोन मुख्य स्मार्टफोनवर ही सुविधा अधिक भाषांसाठी मिळू शकणार आहे हे याचे विशेष. या अॅपची किमत आहे तीन पौंड.

Leave a Comment