फेसबुक, ट्विटर मुळे निराशा

लंडन, दि. ९ –  जर सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर तुमच्या मित्राचे पोस्ट तुमच्या पोस्टच्या तुलनेत जास्त लोकांना आवडते, तर तुम्ही निराश होता का? जर हो, तर असे फक्त तुमच्यासोबत होत नाही. एक सर्वेक्षणानुसार ट्विटर व फेसबुक सारख्या साइटवर आपल्या मित्राने पुढे जाण्याची स्पर्धा, लोकांना कुंठित बनवण्यासह त्यांच्या आत्मविश्‍वासावरही परिणाम टाकत आहे.

टेलीग्राफ वृत्तपत्रानुसार या सर्वेक्षणात सहभाग घेणारे निम्मेपेक्षा जास्त लोकांचे मत होते की, या साइटने त्यांचे वर्तन बदलले असून ते सोशल मीडियाच्या कुप्रभावाला बळी पडले आहेत. तसेच दोन तृतीयांश लोकांचे मत होते की, या साइटवर वेळ घालवण्यानंतर ते आराम करू शकत नाहीत. तसेच एक चथुर्तांश लोकांनी मानले की, या साइटमुळे ते भांडकुदळ झाले ज्याची भरपाई त्यांना आपले संबंध व कार्यस्थळावर भोगावी लागत आहे.

ब्रिटेनचे सेलफोर्ड विद्यापीठ बिजनेस स्कूलकडून केलेल्या या सर्वेक्षणात २९८ लोकांनी सहभाग घेतला. यापैकी ५३ टक्के लोकांचे मत होते की, सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या वर्तनात बदल घडला आहे आणि त्यापैकी ५१ टक्के लोकांनी याला नकारात्मक प्रभाव सांगितला.

५५ टक्के लोकांचे म्हणणे होते की, जर ते आपले फेसबुक अकाउंट किंवा-मेल अकाउंट उघडु शकत नसतील तर ते चिंतित होतात. याने कळते की, कोणत्या प्रकारे इंटरनेटच्या सवयीने लोकांना जाळ्यात अडकवले आहे.

Leave a Comment