ऑलिंपिक्सच्या उदघाटनाआधी लंडनमध्ये घंटानाद

लंडन दि.९- जुलै २७, २०१२ ला लंडन येथे होणार्‍या ऑलिंपिक्स उद्घाटन समारोहाच्या आधी बरोब्बर बारा तास म्हणजे ७१२ जीएमटीला लंडनमधील सर्व बेल खणखणणार आहेत. टर्नर प्राईज विनर ४३ वर्षीय मार्टिन क्रीड या स्कॉटीश आर्टिस्टकडे सोपविण्यात आलेल्या वर्क नं.११९७ मध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ऑल द बेल्स इन द कंट्रि असे या कार्यक्रमाचे नांव असून त्यात सांगितलेल्या वेळी चर्च, सायकल, हातातल्या घंट्या, जहाजावरील घंट्या तीन मिनिटे जोरात वाजविण्याचे आवाहन सर्व जनतेला करण्यात आले आहे. प्रत्येकाला या घंटानादात सहभागी होता यावे म्हणून मोबाईलच्या रिंग वाजविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

ऑलिंपिक्सच्या सांस्कृतिक कार्यक्रमात होणार्‍या या घंटानादासाठी ज्यांना मोबाईल वरून हा घंटानाद करायचा आहे त्यांना प्रोजेक्ट वेबसाईटवरून रिंग टोन डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे क्रीड याने सांगितले आहे.

Leave a Comment