फेडरर पीट संप्रासच्या विक्रमापासून एक पाऊल दूर

लंडन, दि. ८ –  रेकॉर्डनीय १६ ग्रँड स्लॅम विजेता रोजर फेडरर विम्बलडन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये आठव्यांदा अंतिम लढतीत पोहचून अमेरिकेचा महान टेनिस खेळाडू पीट संप्रासच्या विक्रमची बरोबरी करण्याजवळ आहे. संप्रासच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक आठदा विम्बलडन चॅम्पियनशिप जिंकण्याचा विक्रम आहे.

३० वर्षीय फेडररदेखील आठदा अंतिम लढतीत पोहचून त्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याजवळ आहे. अंतिम लढतीत त्याचा सामना ब्रिटेनच्या अँडी मरेशी होईल. फेडररने विम्बलंडन स्पर्धेत १४ वेळा भाग घेतला असून, ज्यात सात वेळा जिंकण्यात यशस्वी राहिला.

फेडरर २००३ पासून २००९ पर्यंत या ग्रास कोर्टवर सतत अंतिम लढतीत पोहचण्यात यशस्वी राहिला होता. सतत सात अंतिम लढतीत त्याला फक्त एकदा २००८ मध्ये पराभव मिळाला होता. ज्यात स्पेनच्या राफेल नडालने रोमांचक फेरीत फेडररला मात दिली होती.

-विम्बलडन अंतिम लढतीतील फेडररचा प्रवास
– वर्ष विरोधी देश स्कोर
-२००३, मार्क फिलीपोउसिस, ऑस्ट्रेलिया, ७-६, ६-२, ७-६
-२००४,अँडी रोडिक, अमेरिका, ४-६, ७-५, ७-६, ६-४
-२००५, अँडी रोडिक, अमेरिका, ६-२, ७-६, ६-४
-२००६, राफेल नडाल, स्पेन, ६-०, ७-६, ६-७, ६-३
-२००७, राफेल नडाल, स्पेन, ७-६, ४-६, ७-६, २-६, ६-२
-२००८, राफेल नडाल, स्पेन, ४-६, ४-६, ७-६, ७-६, ७-९
-२००९, अँडी रोडिक, अमेरिका, ५-७, ७-६, ७-६, ३-६, १६-१४.

Leave a Comment