फुटबॉलसाठी आता पाच रेफरी

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघाच्या नवीन धोरणानुसार आता फुटबॉल सामान्यासाठी पाच रेफरी नियुक्त केले जाणार आहेत. त्याला फुटबॉल संघाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात आता पाच रेफरी दिसणार आहेत. 

संघाने दिल्या माहितीनुसार दोन अधिकारी आणि रेफ्रीच्या सोबत आता आणखीन  दोन लाईनमनची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन रेफरी हे दोन्ही टीमच्या गोलालाइन भागातील हालचालीवर आता बारीकपणे नजर ठेवणार आहेत. त्याशिवाय त्यांची नजर ही पेनल्टी बॉक्सच्या भागावर देखील आसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा स्वरुपाची मागणी पुढे येत होती. विशेषतः स्पर्धा आयोजित केल्या जाणाऱ्या क्लबकडून ही मागणी केली जात होती.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघात इंग्लंड, आयर्लंड. स्कॉटलंड त्याशिवाय वेल्स व फुटबालची सर्वोच्च संघटना असलेल्या फिफा या संघटनेचा सहभाग आहे. नियमात बदल करण्यासाठी अथवा परिवर्तन करण्यासाठी आठ मधील सहा मते मिळणे आवश्यक होते. ते मते मिळल्याने आता काही दिवसातच फुटबॉलच्या सामन्यात आता पाच रेफरी दिसणार आहेत. 

Leave a Comment