इंजिनियरिंगचे स्वप्न साकार करा ते ही मोफत

आर्थिक परिस्थिती नाजूक असणार्‍या विद्यार्थ्यांचे इंजिनीयर होण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रूपये एवढे आहे, अशा विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगला मोफत प्रवेश मिळणार आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या जागांसाठी २०१२-१३ या वर्षीच्या अँडमिशनसाठी पालकांच्या उत्पनाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून (एआयसीटीई) हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात येत्या १४ जुलैपासून सुरू होण्यार्‍या काउंसिलिंगमध्ये देखील सामाविष्ट करण्यात येणार आहे.

इंजिनियरिंग, आर्किटेक्चर, फार्मेसी, हॉटल मॅनेजमेंट आणि फॅशन डिझाइनिंग या अभ्यासक्रमात पाच टक्के जागा आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. गेल्या वर्षी या जागांसाठी २.५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना प्रवेश देण्याचा नियम होता.

Leave a Comment