
नवी दिल्ली दि.९- टिव्हीएस मोटर्स बीएमडब्ल्यू या प्रसिद्ध वाहनकंपनीच्या मोटरसायकल विभागाशी तंत्रज्ञान सहकार्य करार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे टिव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सोमवारी जाहीर केले.
याविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवासन म्हणाले की बीएमडब्ल्यूच्या मोटरसायकल विभागाबरोबर तंत्रज्ञान सहकार्य कराराची बोलणी आम्ही करत असून त्यामुळे आधिक पॉवरफुल मोटरसायकल बनविण्यास आम्हाला मदत होणार आहे.