खाण गैरव्यवहारप्रकरणी येडियुरप्पांची चौकशी

बंगळुरू, दि. ८ – सदानंद गौडा यांचे नेतृत्व बदलून जगदीश शेट्टर यांची वर्णी लावण्यास भाजपच्या श्रेष्ठींना झुकविल्याबद्दल आनंद साजरा करीत असतानाच अवैध खाण गैरव्यहारप्रकणी सीबीआयने माजी मुख्यमंत्री बी, एस. येडियुरप्पा यांची चौकशी केली.

तसेच, या प्रकरणी त्यांना व त्याचे चिरंजीव व भाजपचे लोकसभा सदस्य बी. वाय. राघवेंद्र आणि माजी मंत्री एस. एन. कृष्णय्या शेट्टी यांनाही प्रश्‍न विचारण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

सीबीआयने याप्रकरणी येडियुरप्पा, राघवेन्द्र, दुसरे चिरंजीव आर. एन. सोहन कुमार आणि शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. खाण परवाना देण्यासाठी खाजगी कंपनीकडून लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.