कसाबप्रमाणे अबुलाही बिर्याणी!

नवी दिल्ली, दि. ८ – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा जीवित धरलेला एकमात्र आरोपी अजमल कसाबप्रमाणे या हल्ल्याचा हँडलर अबू हमजा उर्फ अबू जिंदालला देखील बिर्याणी खाण्याची आवड आहे. कसाबला जेथे तिहार तुरूंगात बिर्याणी पुरवठा केली जात होती तसेच आता अबू जिंदालची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांनी घेतली आहे. जिंदाल २० जुलैपर्यंत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कोठडीत आहे.

सूत्रानुसार जिंदालची बिर्याणी खाण्याची इच्छा दिल्ली पोलिसाच्या कोठडीत पूर्ण केली जात आहे. त्याच्या सांगण्यावर उशिर जरी झाला तरी बिर्याणी आणली जाते. सीबीआयचे अधिकारी कोठडीत आलेल्या जिंदालशी दररोज २० तास चौकशी करत आहेत. त्याला फक्त चार तास आराम करू दिला जात आहे. जिंदाल मूळ रूपाने महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याला अटक केल्याची माहिती देऊनही कुटुंबातून भेटण्यासाठी कोणीही आले नाही. तो कोठडीतही नमाज अदा करत आहे.