
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुडमधील नायक मंडळींना दिग्दर्शनाची ओढ लागलेली दिसत आहे. एकमेकांच्या पावलावर पावले ठेवीत आता रणबीर कपूरने दिग्दर्शन क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याच्याकडे असलेल्या बहुचर्चित `बर्फी’ चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम संपल्यानंतर तो दिग्दर्शनच्या कामास सुरुवात करणार असल्याचे समजते.
