नवी दिल्ली, दि. ९ – देशात कंपन्यांमध्ये क्लाउड कंप्युटिंग प्रणालीवरुन वाढती लोकप्रियता लक्षात घेता उद्योग मंडळ सीआयआयने सांगितले की, सरकारी एजन्सीकडून एक समर्पित धोरण बनवायला हवे, ज्यात या तंत्रज्ञानाची खरेदी आणि वापराच्या प्रमाणाची व्याख्या असायला हवी.
क्लाउंड कंप्युटिंगप्रती वापरानुसार, निर्णय मॉडलवर आकड्यांचा स्टोर करणे आणि सॉफ्टवेअरपर्यंत पोहोचण्याची सुविधा देत असतो, ज्यात कंपन्यांची खरेदी किंमत घटविण्यास मदत होते आणि त्यांना आयटीच्या स्थापनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागत नाही. क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठा करणार्या प्रमुख कंपन्यात गूगल, एमेजन आणि मायक्रोसॉफ्टचा समावेश आहे ज्या जगभरात सर्वरमध्ये आपल्या ग्राहकांची आकडेवारी स्टोर करतात.
सीआयआय, केपीएमजी आणि अमरचंद मंगलदास ऍन्ड श्रॉफद्वारे जाहीर अहवाल `द इंडियन क्लाउड रिवोल्यूशन’मध्ये सांगण्यात आले आहे की, जेथे कंपन्या या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत, सरकार ई-प्रशासनच्या दृष्टीने क्लाउड आधारित सेवेच्या वापरात कर खरेदी किंमतीत उल्लेखनीय कमी करु शकते.