ईशा-झहीरचा ब्रेक अप

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि बॉलीवूड अभिनेत्री ईशा सरवानी यांचे आठ वर्षापासूनचे नाते तुटले आहे. ईशा आता झहीरला फक्त आपला मित्र समजते. ईशा स्वत: म्हणाली की, मी सिंगल आहे. आम्ही दोघे अनेक वर्षे एकसोबत राहिलो, परंतु झहीर आणि माझ्यात जे काही होते ते खत्म झाले आहे. आम्ही दोघे एकमेकांचा आदर करतो. आता आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तथापि, काही दिवसांपूर्वी झहीर आणि ईशाचा लवकरच विवाह होणार आहे, अशा बातम्या झळकल्या होत्या.

ईशाने झहीरसोबतचे नाते तोडण्याचे कारण न सांगता हे वैयक्तिक प्रकरण असून हे आम्हा दोघातच रहायला हवे असे सांगितले. लोकांसमोर एकमेकांवर चिखलफेक करणे चांगले राहणार नाही. सूत्रांनुसार, दोघांचा ब्रेक अप होण्याचे कारण दोघांतील दुरावा आहे. ईशा शक्यतो चेन्नईत राहते, आणि झहीर क्रिकेट खेळण्यासाठी जगभर फिरत असतो. गेल्या वर्षी विश्वचषक आणि आयपीएल सामन्यादरम्यान, झहीरला सपोर्ट करण्यासाठी ईशा नेहमी त्याच्यासोबत राहत होती. नुकतेच झालेल्या आयपीएलमधील ईशाच्या अनुपस्थितीने हे स्पष्ट केले आहे की, दोघांचा ब्रेक अप झाला होता.

यापूर्वी आलेल्या वृत्तानुसार, दोघे एका घराच्या शोधात होते.  तेथे ते विवाहानंतर राहू शकतील. तथापि, ईशाने या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. झहीरचे नाव नुकतेच वीजे आणि मॉडल रमोनासोबत जोडले गेले होते. सांगण्यात आले होते की, झहीर आणि रमोनासोबत फिरताना दिसून आले होते. ईशाने याविषयी काही बोलण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment