’मुलगी चोर’ सीसीटीव्हीत कैद

मुंबई, ७ जुलै-ही बातमी आहे एका चोरीची. ही चोरी म्हणजे दागिने किंवा पैशांची नव्हे. तर ही चोरी आहे चक्क एका लहानग्या मुलीची. महत्त्वाचे म्हणजे हा मुलगी चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे.

ही घटना आहे महिना भरापूर्वीची १० जूनची रात्रीचा एक वाजलेला गाडीची वाट पहात सीएसटी प्लॅटफॉर्मवर प्रवासी निपचीत झोपलेले, त्यातच चोर पावलाने येत एका चोराने ३ वर्षांच्या लहान मुलीला अलगद उचलले. आई-वडिलांचे काही क्षणासाठी कदाचीत डोळे लवले असतील, तेवढ्यात ते डोळू चुकवून मुलीला कडेवर घेऊन चोराने पोबारा केला केवळ ४० सेकंदाचा हा घटनाक्रम ही सर्व दृश्यं सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत.

एका मजुराची ही मुलगी असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे. एक महिना होऊनही मुलीचा ठावठिकाणा अजूनपर्यंत लागलेला नाही. कॅमेर्‍यात कैद या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. एका पायाने लंगडत चालणार्‍या या चोराने लहान मुलीची चोरी करून प्लॅटफॉर्मच्या एका बाजूने तो निघून गेला.

सीएसटी स्टेशनवरील दहशतवादी हल्ल्याला काही काळ लोटत नाही तोच इथली सुरक्षा व्यवस्था पुन्हा किती ढिली आहे, हेच या घटनेनंतर पुढे येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता चार ते पाच टीम्स तयार केल्या असून विविध स्टेशन्सवर तपास सुरू केला आहे.

Leave a Comment