शेतकरी संघटना गनिमी काव्याच्या आंदोलनाच्या तयारीत

पुणे – सरकारशी चर्चा करून ठरविलेल्या दरानुसार शेतकर्र्यांना ऊसाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी सरकारला दहा दिवसांची मुदत देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र त्यानंतरही पैसे न मिळाल्यास शेतकरी संघटना गनिमीकाव्याने उग्र आंदोलन करेल; असा इशारा संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

ऊसाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम त्वरित मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने पुणे रेल्वे स्थानकाजवळील गांधी पुतळयापासून सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भांडारकर रस्त्याजवळील घरापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी रघुनाथदादा पाटील यांना पुणे मुंबई महामार्गावर स्थानबध्द केले. या मोर्चाला परवानगी नाकारण्याबरोबरच पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला. शहराची नाकेबंदीही करण्यात आली. सर्व संबंधित ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याअंतर्गत शहराच्या विविध ठिकाणाहून संघटनेच्या शेकडो कार्यकत्यांना ताब्यात घेण्यात आले.      
तरीही मोर्चा निघणारंच असा संघटनेचा निर्धार होता. त्यानुसार संघटनेचे कार्यकर्ते मोठा बंदोबस्त असूनही मोर्चाच्या ठिकाणी जमले. मात्र दुपारी पोलिसांबरोबरंच रघुनाथदादा गांधी पुतळयाजवळ आले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. यावेळी रघुनाथदादांसह ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची रवानगी राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानात करण्यात आली. एकूण ५२३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली.

संध्याकाळी सहकार आयुक्त कार्यालयाच्या प्रतिनिधीने आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मुदत देण्याची मागणी केली. इतके दिवस थांबलो आहोत. अजून १० दिवस थांबू. मात्र त्यानंतरही ऊसाचा पहिला हप्ता न मिळाल्यास संघटना गनिमीकाव्याने आंदोलन करेल आणि संबंधित मंत्री, अधिकारी आणि शेतकयांचे पैसे न देणाया सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्ष आणि पदाधिकायांच्या गाडया रस्त्यावर कशा धावतील तेच आम्ही पाहू, असा इशारा रघुनाथदादांनी दिला. संध्याकाळी सर्व कार्यकत्यांची मुक्तता करण्यात आली.

Leave a Comment