भारतात ९३ कोटी लोकांकडे मोबाईल

नवी दिल्ली, दि. ६ –  मोबाइल फोनप्रती लोकांमध्ये वेडापणा इतका वाढला की, आता हे प्रत्येक वर्गातील लोकांचे हृदय स्पंदन बनले आहे. याचे ताजे उदाहरण ट्रायची नवीन आकडेवारी सांगत आहे. यानुसार देशात मोबाइल फोन ग्राहकांची संख्या मे महिन्यात वाढून ९२.९३ कोटी झाली.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ची बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात ८३.५ लाख नवीन मोबाइल ग्राहक जुडले. दुसरीकडे लँडलाइन व मोबाइल ग्राहकांना मिळून एकुण टेलीफोन ग्राहक संख्या ९६.०९ कोटी झाली. यासह देशाचे टेलीफोन घनत्व ७९.२८ टक्के झाले.

मोबाइल फोन उपयोग करणार्‍या ९२.९३ कोटी ग्राहकांमध्ये भारतीय एयरटेलचे १८.५३ कोटी ग्राहक आहेत ज्याने एकट्या मे महिन्यात सुमारे २० लाख नवीन ग्राहक जोडले.

नवीन आकडेवारीनुसार इतर कंपन्यांमध्ये आयडिया सेल्युलरचे ११.५९ कोटी, यूनिनॉरचे ४.५ कोटी, वोडाफोनचे १५.२५ कोटी, एयरसेलचे ६.४४ कोटी व रिलायन्स कम्यूनिकेशनचे १५.४ कोटी ग्राहक आहेत.

एकीकडे जेथे खासगी मोबाइल सेवा प्रदाता कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यातील ग्राहकांची संख्या घटत आहे. बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या ८१,८०९ घसरून ९.७७ कोटी व एमटीएनएलच्या ग्राहकांची सं‘या १,७१,९५१ घसरून ५६ लाख झाली.

ताज्या आकडेवारीनुसार ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या एप्रिलमध्ये जेथे १.३९५ कोटी होती, दुसरीकडे मे मध्ये ही संख्या वाढून १.४३१ कोटी झाली. तसेच वायरलेस ग्राहकांची संख्या मे मध्ये घसरून ३.१५३ कोटी झाली, जी एप्रिलमध्ये ३.१८९ कोटी होती.

Leave a Comment