मधुमेहाला रोखणार भारतीय रोपांचा अर्क

सिडनी, दि. ५ –  वैज्ञानिकांनी काही भारतीय आणि काही ऑस्ट्रेलियन औषधी रोपांचा अर्क तयार केला आहे, जो मधुमेह रोखण्यास महत्त्वाचा ठरु शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या स्विनबर्न तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी १२ औषधी रोपांच्या अर्काची चाचणी केली, जेणेकरुन शोध घेतला जाऊ शकेल की, यात कार्बोहायड्रेट उपापचयमध्ये सक्रिय दोन प्रमुख एन्जाइम्सला मंद करण्याचा गुण आहे की नाही, जो रक्त शर्करा आणि मधुमेहाला प्रभावित करतो. हा अर्क ऑस्ट्रेलियातील सात प्राचीन औषधी रोपे आणि पाच भारतीय आयुर्वेदिक रोपांमधून काढण्यात आला आहे.

`बीएमसी कॉम्पलीमेंट्री ऍन्ड आल्टरनेटिव मेडिसिन’ नियतकालिकेच्या अहवालानुसारख्या अर्कात ऑस्ट्रेलियन सँडलवूड आणि भारतीय किनो रोपांचा अर्क दोन्ही एंजाइम्सला मदत करण्यात खूप प्रभावी राहिले आहेत. स्विनबर्न विद्यापीठाचे एसोसिएट प्रोफेसर आणि शोधाचे सहलेखक एंजो पालोमबो म्हणाले, मधुमेह जागतिक जन आरोग्याच्या ओझाचे प्रतिनिधीत्व करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार, सध्या जगभर १८ कोटीपेक्षा जास्त लोक मधुमेहाने पीडित आहेत.

स्वीनबर्नच्या एका कथनकानुसार, पालोमोबा म्हणाले, आठशेपेक्षा जास्त रोपे पारंपारिकपणे कोणत्या न कोणत्या रुपात मधुमेहाच्या उपचारासाठी वापरले जातात.