महिला अत्याचाराच्या तक्रारीसाठी एकच टोल फ्री नंबर

सांगली,  दि. ४ – महिलांवरील अत्याचाराची तक्रार नोंदवण्यासाठी राज्यात पोलिसांचा एकच टोल फ्री नंबर सुरु केला जाणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगलीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात याची घोषणा केली.
सांगलीत झालेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होत्या. सुप्रिया सुळे यांनी यावेळी महिलांवरी अत्याचारासंदर्भात पावले उचलण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळेंची ही मागणी मान्य करत आबांनी राज्यातील महिलांसाठी पोलिसांचा एक टोल फ्री नंबर सुरु करणार असल्याची घोषणा केली. तसेच यांनी स्त्रीभ्रूण हत्याबाबत आता गृहखाते जबाबदारी घेईल असेही स्पष्ट केले.

या मेळाव्यात जिल्ह्यातील युवतींनी अनेक विषयांवर आक्रमकपणे मते व्यक्त केली. आबांची कन्या स्मिता हिच्या भाषणाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी या मुली लोकसभेत जायला हव्यात असे सूचक उद्गार काढले.

Leave a Comment