नवी दिल्ली -पाटणा, दि. ४ – देशातील अनेक नेत्यांचे स्विस बँकातील कथित खात्यांमध्ये कोट्यावधी रुपये ब्लॅकमनीच्या स्वरूपात असल्याची नेहमी चर्चा होत असते. मात्र, या दरम्यान देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे बँक खाते आजही देशातील एका राजकीय नेत्याचा साधेपणा आणि राजकीय चारित्र्याचे अद्भुत उदाहरण आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या पाटणा येथील एक्जिबिशन रोड शाखेचे मुख्य व्यवस्थापक एसएल गुप्ता यांनी सांगितले की, राजेन्द्र प्रसाद यांनी २३ मे १९६२ पर्यंत राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केल्यानंतर पाटणाला परतले. येथे पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) च्या या शाखेत २४ ऑक्टोबर १९६२ रोजी खाते उघडले होते. त्याचा क्रमांक आता ०३८००००१००३०६८७ आहे. देशाचे पहिले राष्ट्रपतींचे खाते ठेवा म्हणून सांभाळून ठेवला आहे. कारण हे पीएनबीसाठी अभिमानाची बाब आहे. राष्ट्रपतींना आम्ही `प्राइम कस्टमर’चा दर्जा दिला आहे.
ते आमच्यासाठी सन्माननीय ग्राहक आहेत. गुप्ता यांनी सांगितले की, नियमानुसार एका वर्षात खात्याचा वापर न झाल्यास ते `निष्क्रिय’ घोषित केले जाते. मात्र राजेन्द्र बाबू यांचे खाते अजूनही `सक्रिय’ आहे. या खात्यातून देवाण घेवाण होत नाही. मात्र यात दरसहा महिन्याला व्याज जमा होते आणि यावेळी या खात्यात १८१३ रुपये जमा आहेत.
राजकीय विचारवंत के. गोविंदाचार्य म्हणाले, “भारताची परंपरा राहिली की, सत्तेचे सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती साधी, मितव्ययता आणि देशभक्तीचे जिवंत स्वरूप असावी. डॉ. राजेन्द्र प्रसाद तसे होते.”