घोषणेपूर्वीच लीक झाला गॉड पार्टिकलचा व्हिडियो

लंडन, दि. ५ – मानवाची सर्वात मोठी जिज्ञासा आहे की, पृथ्वी तलावर सृष्टीची रचना कशी झाली, ही जिज्ञासा आज शांत होऊ शकते. जेनेवातील सर्वात मोठी प्रयोगशाळा सर्नमध्ये हा शोध पूर्ण झाला आहे. येथे वैज्ञानिकांच्या टीम गॉड पार्टिकलचे रहस्य उलगडण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गॉड पार्टिकलचे नाव हिग्स बोसॉन आहे. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चचे (सर्न) वैज्ञानिक आज या शोधाची घोषणा करु शकतात. परंतु, वार्ता अशी आहे की, या घोषणेपूर्वीच या प्रयोगाचा व्हिडिओ लीक झाला आहे. औपचारिक घोषणेच्या काही तासापूर्वीच युरोपियन आर्गेनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च म्हणजे सर्नच्या यशाचा व्हिडिओ लीक झाला आहे व तो चुकीने वेबसाईटवर पोस्ट झाला आहे.

जिनेवाच्या जवळ काही फूट जमीनीत सर्नच्या प्रयोगशाळेत हजारो वैज्ञानिक याचा शोध घेतात. फ्रान्समध्ये आणि स्विर्त्झलँडच्या सीमेजवळ जमीनीत ३०० फूट खोल वैज्ञानिक अनेक वर्षापासून प्रयोग करत होते. २७ किलोमीटर लांब लार्ज हॅड्रन कोलायडर (एलएचसी) मध्ये वैज्ञानिक अणुंमध्ये टक्कर घडवून आणत होते. या कणांना गतीने घुमवणारी जगातील सर्वात मोठी मशीन आहे.
वैज्ञानिक धारणा आहे की, हिग्स बोसॉनचे कण १३.७ खरब वर्षापूर्वी बिग बँग म्हणजेच महास्फोटादरम्यान निर्माण झाले आणि या महास्फोटात ब्रह्मांड अस्तित्वात आले. एलएचसीद्वारे ठीक त्याचप्रकारचे बिग बँग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जो खरबो वर्षापूर्वी झाला होता. या महाप्रयोगाच्यावेळी एलएचसीमध्ये कण तेज गतीने फेकण्यात आले. जेणेकरुन त्यांची एकमेकांना धडक होईल. सुरुवातीला वैज्ञानिकांनी प्रोटान्सची टक्कर केली परंतु त्यांना काही मोठे यश मिळाले नाही. नोव्हेंबर २०११ साली वैज्ञानिकांनी प्रोटॉन्सच्या जागी काही आयन्सची टक्कर घडवून आणली. या टक्करीच्या परिणाम हैराण करणारे राहिले. डिसेंबरमध्येही वैज्ञानिकांनी घोषणा केली होती की, ते गॉड पार्टिकलच्या खूप जवळ पोहोचले आहेत.

जर गॉड पार्टिकलचे अस्तित्व सिद्ध झाले, तर भविष्यात ब्रह्मांडाविषयीची माहिती शोधणे सोपे होईल. आतापर्यंत वैज्ञानिकांना केवळ पाच टक्केच ब्रह्मांडाची माहिती आहे. बाकीचा भाग डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटर नावाने ओळखला जातो. ब्रिटिश वृतपत्र डेली टेलीग्राफनुसार हिग्स बोसॉनची भविष्यवाणी करणार्‍या पाच वैज्ञानिकापैकी चार जीवंत आहेत आणि ते बुधवारी घोषणेदरम्यान उपस्थित राहतील.

Leave a Comment