जोहान्सबर्ग, दि. ४ – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रँम पोलाकने डीआरएस लागू करण्यात बीसीसीआय अडसर निर्माण करीत असल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डीआरएसची उपयोगिता महत्त्वाची असल्याचे सांगून पोलाकने भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय)वर टीका केली. पोलाकने डीआरएस लागू होण्यात होत असलेल्या विलंबासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी)ला जबाबदार धरले आहे.
पोलाकचे बीसीसीआयवर टिकास्त्र
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू असलेला पोलाक म्हणाला, बीसीसीआय डीआरएसला सातत्याने विरोध करीत आहे कारण ती भारतीय फलंदाजांसाठी ठीक नाही. पोलाकने सांगितले की, डीआरएस अशा संघाच्या बाजूने आहे ज्यात खूप चांगले फलंदाज आहेत. मात्र तरीही भारत एकट्याच्या बळावर डीआरएस लागू करण्यात अडथळा निर्माण करीत आहे.
पोलाकने गेल्या आठवड्यात क्वालालंपुरमध्ये आयसीसी बोर्डाच्या बैठकीदरम्यान बीसीसीआयने डीआरएसला विरोध करण्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयच्या विरोधानंतर ही प्रणाली लागू होऊ शकली नाही. यात इनफ्रारेड कॅमरे, मायक्रोफोन आणि चेंडूला ट्रॅक करणार्या उपकरणांचा वापर केला जातो. पंचांना याची मदत होते.
तो म्हणाला, ही प्रणाली भारताच्या आघाडीच्या सहा फलंदाजांसाठी अनुकूल नाही.