
लंडन, दि. ५ – मानवाची सर्वात मोठी जिज्ञासा आहे की, पृथ्वी तलावर सृष्टीची रचना कशी झाली, ही जिज्ञासा आज शांत होऊ शकते. जेनेवातील सर्वात मोठी प्रयोगशाळा सर्नमध्ये हा शोध पूर्ण झाला आहे. येथे वैज्ञानिकांच्या टीम गॉड पार्टिकलचे रहस्य उलगडण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गॉड पार्टिकलचे नाव हिग्स बोसॉन आहे. युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चचे (सर्न) वैज्ञानिक आज या शोधाची घोषणा करु शकतात. परंतु, वार्ता अशी आहे की, या घोषणेपूर्वीच या प्रयोगाचा व्हिडिओ लीक झाला आहे. औपचारिक घोषणेच्या काही तासापूर्वीच युरोपियन आर्गेनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च म्हणजे सर्नच्या यशाचा व्हिडिओ लीक झाला आहे व तो चुकीने वेबसाईटवर पोस्ट झाला आहे.