वीणा मलिकला व्हायचे आहे गायक

पाकिस्तानातील वादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक हिला अभिनेत्रीच  नाही तर गायिका व्हायचे आहे. अशा स्वरुपाची इच्छा तिने नुकतीच प्रदर्शित केली आहे. सध्या ती आनंद बलराज दिग्दर्शित ‘दाल में कुछ काला है’  या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.  बिग बॉस मध्ये तिने अस्मित पटेल सोबत केलेला रोमान्स अजून ही सर्वाना आठवतो.

वीणा  म्हणते, बॉलीवूड खूपच सुंदर आहे. याठिकाणी अभिनय करायला मला आवडते. शिवाय  माझे खूप दिवसापासून गायिका व्हायचे स्वप्न याठिकाणी पूर्ण करायचे आहे. मात्र मी सुंदर असल्याने गायिका होण्या ऐवजी मला अभिनय करण्याचाच सल्ला मिळतो.  त्यामुळे मी अभिनय क्षेत्राकडे वळले आहे.

लहानपणापासून  माझी हजारो प्रेक्षक असलेल्या व्यासपीठावर गाण्याची इच्छा आहे मात्र ती कधी पूर्ण होणार याची सध्या वाट पाहत आहे. त्यासाठी काही दिवसापासून गाण्याचा सराव  सुद्धा करत असल्याचे तिने स्पष्ट केले. 

मी जरी गेल्या काही दिवसापासून अभिनयचा आनंद घेत असले तरी मला यामधून म्हणावा तसा आनंद मिळत नाही. त्यामुळे मी सध्या माझे गायिका होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत असल्याचे वीणाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले