कॉटन टी शर्टवर करा सेल फोन चार्जिंग

कॉटनचे टी शर्ट भविष्यात तुमचे सेल फोन चार्ज करू शकतील असे सांगितले तर विश्वास ठेवाल ? नाही नां ? पण थांबा. यावर विश्वास ठेवावा असे कांही रिझल्ट याबाबत संशोधन करत असलेल्या साऊथ कॅरोलिना विद्यापीठातील झोंगडॉग ली यांना मिळाले आहेत. म्हणजे भविष्यात सेल फोनचा चार्जर बरोबर नसला तरी सेलफोन चार्ज करता येणार हे आता नक्की धरायचे.

ली या संशोधनाबाबत सांगतात की आपण रोज वापरतो ते कॉटनचे कपडे फ्लेक्झिबल एनर्जी स्टोरेज म्हणून वापरता येतील का यासाठी काही प्रयोग केले. त्यासाठी त्यांनी कॉटन टी शर्ट फ्लुरॉईच्या द्रवात भिजवून वाळविले व ऑक्सिजन जाणार नाही अशा पद्धतीने ते उच्च तापमानाला तापविले. तेव्हा कपड्याच्या पृष्ठभागावर त्यांना इन्फ्रारेड सेल्युलोज आढळले ज्याचे अॅक्टीव्हेटेड कार्बनमध्ये रूपांतर होत होते. मात्र इतक्या प्रयोगानंतरही मूळ कपडा पूर्वीप्रमाणेच लवचिक होता आणि त्याची व्यवस्थित घडीही घालता येत होती.

या कार्बनचा वापर करून कपॅसिटरप्रमाणे काम करू शकणारे छोटे छोटे कापडाचे तुकडे त्यांनी तयार केले. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये कपॅसिटर महत्त्वाचा घटक असतोच. कार्बन टेक्स्टाईल तर डबल लेअर कपॅसिटरचे काम करताना आढळला व त्यात उच्च उर्जा साठविणे शक्य असल्याचे या प्रयोगातून सिद्ध झाले. यावर नॅनो तंत्रज्ञानाने आणखी एक मँगनीजचा कोट चढविण्यात आला तेव्हा त्यावर सेलफोन अथवा आयपॅड चार्ज करता येऊ शकते असेही दिसून आले. विशेष म्हणजे कितीही वेळा हे चार्जिंग करता येते असेही ली यांना आढळले. हे संशोधन अॅडव्हान्स मटेरियल्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment