
समाजात उच्चभ्रू म्हणून मिरविणाऱ्याच्या समाजसेवेला फारसे कुणी मनावर घेत नाही. त्यातून ती मंडळी सिनेक्षेत्रातील ‘तारामंडळा’तील असतील तर बघायलाच नको. त्यांची समाजसेवा म्हणजे त्यांच्या ‘अभिनया’चेच प्रदर्शन किंवा प्रसिद्धीचा ‘स्टंट’ समाजाला जातो. अनेकदा त्यात तथ्यही असते. मात्र अभिनेता अभय देओल हा ‘ग्रीन पीस’ या पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या संस्थेचा पदाधिकारी आहे. पर्यावरण रक्षणाची केवळ भाषणे न ठोकता आपल्या घरातूनच त्याची सुरुवात करण्याचा निर्धार अभयने केला आहे. त्याला मनापासून साथ आहे ती त्याची मैत्रीण प्रीती देसाई हिची.
