रजनीकांतचे पहिले आयटेम साँग- किमत १५ कोटी

तमीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर आमीरखानच्या बर्‍याच लांबलेल्या तलाश या चित्रपटासाठी आयटेम नंबर करण्यास होकार दर्शविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अर्थात रजनीकांत सारखा महागडा स्टार या आयटेम साठी किती पैसे आकारेल अशी उत्सुकता तुम्हाला वाटणे साहजिक आहे. मग तुमच्या माहितीसाठी सांगतो की रजनीकांत या एका गाण्यासाठी तब्बल १५ कोटी रूपये घेणार असल्याचे समजते. ६१ वर्षीय रजनीकांतचे हे आजपर्यंतच्या कारकिर्दीतील पहिलेच आयटम साँग आहे.

मात्र तलाश च्या निर्मात्यांना केवळ १५ कोटी रूपये मोजून भागणार नाही तर हे गाणे चित्रित करण्यासाठी आणखी ५० कोटी रूपयेही खर्चावे लागणार आहेत. २०० देशांतील ५० विविध लोकेशन्सवर हे आयटम साँग चित्रित केले जाणार असून त्यात बॉलिवूडचे बादशहा, महान स्टार , क्रिकेटमधील चमकते तारे, राजकारणी यांचेही दर्शन होणार आहे. आमीरच्या टिव्ही शोमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण दीर्घकाळ रखडले असल्याचेही सांगण्यात आले असले तरी येत्या नोव्हेंबरमध्ये तो प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment