
बंगळुरू दि.२ – कर्नाटकातील बंडखोरांनी फडकावलेले बंडाचे निशाण खाली उतरवून पांढरे निशाण दाखविण्याची तयारी ठेवली आहे त्यामुळे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्यावरील संकट तूर्त टळले आहे. राजीनामा देणारे सर्व मंत्री आपले राजीनामे मागे घेण्यास तयार झाले आहेत.
येडियुरप्पा समर्थक नऊ मंत्र्यांनी राज्यातील नेतृत्व बदलण्याची मागणी करत शनिवारी राजीनामे दिले होते. नऊ मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर मुख्यमंत्री सदानंद गौडांच्या समर्थक मंत्र्यांनीही राजीनाम्याचा इशारा दिला होता.