स्पेनचा सुवर्णाध्याय, युरो २०१२चे जेतेपद

किएव्ह(युक्रेन), २ जुलै-युरो चषकाच्या अंतिम फेरीत स्पेनने इटलीचा ४-०ने पराभव करत युरो २०१२च्या जेतेपदावर नाव कोरले. स्पेनने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत आघाडी घेतली होती. किएव्हच्या ऑॅलिपिंक स्टेडियमवर सुरु झालेल्या या सामन्यात स्पेनने पहिल्या हाफमध्ये दमदार खेळी करत आघाडी घेतली.

स्पेनकडून डेव्हिड सिल्वाने हेडरद्वारे १४व्या मिनिटाला  पहिला गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सिल्वाला स्पर्धेतील हा दुसरा गोल ठरला. त्यानंतर जॉर्डी आल्बाने ४१व्या मिनिटाला गोल केले.

पहिल्या हाफमध्ये २-० अशी आघाडी घेतलेल्या स्पेनने दुस-या हाफमध्ये ही इटलीला कोणतीच संधी दिली नाही. ८४व्या मिनिटला टॉरेसने इटलीच्या गोल पोस्टमध्ये चेंडू सहज धाडला आणि स्पेनला ३-०ने अशी आघाडी मिळाली. त्यानंतर पुढील चार मिनिटात जुआन माताने ८८व्या मिनिटाला गोल करत स्पेनला ४-० अशी आघाडी मिळवून दिली.

Leave a Comment