संयुक्त राष्ट्र ठेवणार शस्त्रास्त्र विक्रीवर नियंत्रण

न्यूयॉर्क, दि. २ – संयुक्त राष्ट्र संघ जगभरातील शस्त्रास्त्र विक्री नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी एक मजबूत आणि कायदेशीर बंधनाचा करार तयार करण्याचा प्रयत्न केला. जगभरात दरवर्षी अडीच लाख लोक बेकायदेशीर शस्त्रामुळे मारले जातात. न्यूयॉर्क स्थित संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात या मुद्द्यावर सोमवारपासून चर्चा सुरू झाली.

अनेक आठवडे चालणार्‍या या चर्चेत कराराची शक्यता तपासली जाईल आणि या मुद्द्यावर सर्वसहमतीचा प्रयत्न केला जाईल. या मार्गात मोठे शस्त्र निर्यातक देश अडचण निर्माण करू शकतात. कारण यामुळे त्यांच्य हितसंबंधांना धोका पोहोचू शकतो. रशिया आणि चीन या जगातील दोन मोठे शस्त्र निर्यातक देशांना या प्रस्तावित कराराच्या अनेक बाबींवर आक्षेप आहे.

दरम्यान, सुरूवातीला विरोध दर्शविणारा अमेरिका या कराराच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. मात्र अमेरिकेचाही या करारात दारूगोळा ठेवण्याबाबत आक्षेप आहे.

Leave a Comment