फ्रान्समध्ये समलिंगी विवाह कायदा होणार

पॅरिस,२ जुलै-फ्रान्सचे पंतप्रधान जीन-मार्क अयरौल्ट यांनी म्हटले आहे की, ’बहुतांश कॅथॉलिक राष्ट्रातील जनतेचा कल पाहून समलिंगी जोडप्यांचे विवाह व त्यांच्या मुले दत्तक घेण्यासंदर्भात फ्रान्सचे नवे समाजवादी सरकार लवकरच कायदा करणार आहे.’
मागील महिन्यात पदभार स्वीकारलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइ ऑलन्ड यांनी निवडणूक प्रचारादरम्यान समलिंगीचे विवाह व मुलांना दत्तक घेणे कायदेशीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी कालावधीची मर्यादेचे वचन दिलेले नव्हते, मात्र लवकरच हा कायदा होणार आहे.

समलिंगी विवाह कायद्याला निकोलस सार्कोझी यांच्या यूएमपी या पुराणमतवादी पक्षाने विरोध केला होता. दोन आठवड्यांपूर्वी ऑलन्ड यांच्या समाजवादी गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सार्कोझींचा पक्ष या कायद्याला आता रोखू शकणार नाही.

त्याचप्रमाणे तृतीयपंथीय तथा लिंग बदलणार्‍या व्यक्तीनी नावे बदलल्याने येणार्‍या प्रशासनातील अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याबाबत सरकारतर्फे हिवाळ्यात चर्चा करण्यात येणार आहे.

डेन्मार्क, पोर्तुगाल, स्पेन, बेल्जियम, नेदरलँड्स आणि स्वीडन या देशांमध्ये समिलिंगी विवाह कायदा सध्या अस्तित्वात आहे. फ्रान्स

या युरोपीयन सहकार्‍यांच्या रांगेत जाऊन बसणार आहे. अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही समिलिंगी विवाहांना पाठिंबा दिला आहे. भारतात सन २००९ मध्ये समलिंगी संबंधांना कलम ३७७ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment