फेसबुक, ट्विटरवर घ्या ऑलिंपिकचा आनंद

नवी दिल्ली,२ जुलै-जर आपण लंडनमध्ये होत असलेल्या ऑलिंपिक २०१२ चा आनंद लुटण्यासाठी तेथे जात नसाल तर नाराज होऊ नका कारण या क्रीडा ’महाकुंभ’च्या आयोजकांनी सोशल नेटवकिंर्ग वेबसाइट फेसबुक, वीडियो शेयरिंग वेबसाइट यूट्यूब, ट्विटर आणि आपल्या वेबसाइटवर याचा प्रत्येक क्षणाची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे.

आतापर्यंत सर्वात महागडी ऑलिंपिक क्रीडा म्हटल्या जात असलेल्या ’लंडन ऑलिंपिक २०१२’ मध्ये केवळ २६ दिवस बाकी आहेत. लंडन ऑलिंपिकच्या आयोजकांनी जगभरात पसरलेल्या ऑलिंपिक चाहत्यांना विविध सामने दाखविण्यासाठी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर थेट प्रसारणाची व्यवस्था केली आहे.

या अधिकृत वेबसाइटवर विविध खेळाचे आयोजन स्थळ, दिवस, ये-जा करण्याचा मार्ग, ऑलिंपिकशी संबंधीत ताजे वृत्त, फोटो, व्हीडियो अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत असलेल्या सर्व देश, त्यांचे अधिकार्‍यांची पूर्ण माहितीही देण्यात आली आहे. याशिवाय आपल्याला आतापर्यंत सर्वात प्रसिद्ध ऑलिंपिक खेळाडूची माहिती असेल तर या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल. येथे आपल्याला डेनमार्कचा प्रसिद्ध नौकानयन खेळाडू पॉल इल्वर, पाच ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला अॅथलीट स्टीव रेडग्रेव आणि अशाप्रकारचे अनेक विक्रम करणार्‍या ऑलिंपिक खेळाडूंविषयी सविस्तर माहिती मिळू शकते.

जर आपण जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवकिंर्ग वेबसाइट फेसबुकवर असाल तर लंडन ऑलिंपिकच्या अधिकृत पेजला फक्त ’लाइक’ करा आणि यासंबंधीत सर्व ताज्या बातम्या छायाचित्रे, वीडियो पाहू शकता. लंडन ऑलिंपिकच्या फेसबुक पेजला आतापर्यंत ४,२८,४१० लोकांनी ’लाइक’ केले आहे आणि एक लाखापेक्षा अधिक लोक याविषयी चर्चा करत आहेत.

अशाप्रकारे मायक्रो ब्लागिंग वेबसाइट ट्विटरवरही लंडन ऑलिंपिकची क्षणाक्षणाची माहिती घेऊ शकतात. ट्विटरवर लंडन ऑलिंपिकचे सात लाखांपेक्षा अधिक फालोवर आहेत. जर आपल्याला व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर वीडियो शेयरिंग वेबसाइट यूट्यूबवर जाऊ शकता. यावरही आतापर्यंत ५२ लाखापेक्षा अधिक लोकांनी वीडियो पाहिले आहेत. एवढेच नाही तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण फेसबुकवर आपल्या मित्रांनाही शेअर करु शकता.
लंडन ऑलिंपिक स्पर्धा २७ जुलैपासून १२ ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे, यात जवळपास २०० देशांचे हजारो खेळाडू भाग घेतील.

Leave a Comment