एक मिनिट ज्यात ६१ सेकंद होते!

लंडन,२ जुलै-जगभरातील घड्याळदारांनी ३० जूनच्या अंतिम मिनिटात ’एक लीप सेकंद’ जोडले जेणेकरून पृथ्वीची अपद्धतशीर चालची भरपाई होऊ शकेल. शनिवारी अंतिम मिनीटात ६० ऐवजी ६१ सेकंद होते कारण आमच्या पृथ्वीच्या गतीची भरपाई करण्यासाठी घड्याळदारांनी एक अतिरित्त* सेकंद यात जोडले.

आमच्या ग्रहाला ३६० डिग्रीची परिक्रमा करण्यासाठी ८६,४०० पेक्षा जास्त सेकंदाचा वेळ लागतो परंतु कक्षेत फिरत असताना सूर्य, चंद्राचे गुरूत्वाकर्षण बल व समुद्राची तरंग आपला प्रभाव टाकते आणि घुर्णन करताना मंदपणा येतो.

याचा निष्कर्ष हा होतो की, पृथ्वीद्वारे घेतलेला वेळ व अंतरराष्ट*ीय अणु वेळ (टीएआय) मध्ये विचलन येते आणि याला दुर करण्यासाठी कॉर्डिनेटेड यूनिवर्सल टाइम (यूटीसी) मध्ये बदल केला जातो. हे समायोजन १९७२ मध्ये सुरू झाले असून ही २५वी संधी होती जेव्हा यूटीसीमध्ये ’लीप सेकंद’ जोडले गेले.

Leave a Comment