यमनमध्ये भूसुरूंग स्फोटात ७३ ठार

सना, दि. १ – यमनच्या दक्षिणी भागात अलकायदाच्या अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरूंगाचा स्फोट होऊन ५० नागरिकांसह ७३ पेक्षा जास्त लोक मारले गेले.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आबयान प्रांतातील जिनजिबार, जार आणि इतर भागात भूसुरूंगे पेरण्यात आली होती. त्यांचा स्फोट होऊन ५० पेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

लष्कराचे एक अधिकारी कर्नल अली मेशाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आबयान प्रांतात भूसुरूंग स्फोटात २३ सैनिकदेखील मारले गेले. आबयान प्रांतात सैनिक आणि अलकायदाच्या अतिरेक्यांदरम्यान संघर्ष सुरू आहे.

Leave a Comment