मावळ गोळीबार – सरकारविरुद्धची अवमान याचिका फेटाळली

मुंबई दि.३०-  ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या माबळ गोळीबारप्रकरणी राज्य सरकारविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली. या गोळीबारात आंदोलन करणारे तीन शेतकरी ठार झाले होते. आयजी खंडेलवाल यांनी आठ पोलिसांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे दाखल केलेल्या अवमानाची याचिका न्या. आर. व्ही. मोरे यांनी फेटाळून लावली.

खंडेलवाल यांनी पोलीस सुपरिटेन्डेंट सोळुंखे(पुणे ग्रामीण), व शंकर केंगार(डीवायएसपी, दौंड विभाग) यांनी वडगावच्या न्याय दंडाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

न्याय दंडाधिकार्‍यानी २४ ऑगस्ट २०११ रोजी गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले होते.
वडगाव मावळचे एक सहायक पोलीस अधीक्षकांस गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. तथापि, १७ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांनी दंडाधिकार्‍यांना अर्ज करून आपल्याला तपासातून मुक्त करावे व ही चौकशी अन्य पोलीस अधिकार्‍यांकडे सोपवावी, अशी विनंती केली होती.
सरकारने जिल्हा पोलीस उपअधीक्षक केंगार यांच्याकडे तपास सोपविला. अहवाल तयार न झाल्याने केंगार यानी २१ नोव्हेंबर २०११ पर्यंत मुदत वाढवून मागितली. दंडाधिकार्‍यांनी हा तपास दौंड पोलिसांकडून काढून वडगाव पोलीस ठाण्याकडे सोपविला.

Leave a Comment